Vasant Smruti Singing Competition

वसंत-स्मृती संगीत स्पर्धा
सर्व संगीतप्रेमींना मन:पूर्वक अभिवादन.

माझे वडील आणि सांगीतिक गुरु कै. वसंतराव ओक (जयंती १एप्रिल– पुण्यतिथी ३मार्च ) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी वेगवेगळ्या कलाकारांच्या नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन श्री यशलक्ष्मी आर्ट ही आमची संस्था नेहमीच करत आली आहे. या वर्षी लॉकडाऊनमुळे हे शक्य झाले नाही . त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षी एक गायनस्पर्धा आमच्या संस्थेमार्फत आम्ही आयोजित करत आहोत. लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या नियमांमुळे ही स्पर्धा ऑनलाइन घेतली जात आहे. उत्तम गायक-गायिका, नवीन रचना रसिकांसमोर याव्यात, त्यांना चांगले व्यासपीठ मिळावे, त्यांची कला जगभरात पोचावी या हेतूने जागतिक स्तरावर या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. मान्यवर परीक्षक या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. विजेत्या स्पर्धकांचे तसेच उत्तम सदरीकरणाचे विशेष व्हिडिओ आमच्या वेबपेजवरून, फेसबुक पेजवरून पोस्ट केले जातील. इच्छुक स्पर्धकांनी यात जरूर सहभागी व्हावे व भरभरून प्रतिसाद द्यावा. आपणासारखे संगीतप्रेमी, आपले मित्रमैत्रिणी व रसिकांपर्यंत हे पोहोचवावे, ही नम्र विनंती.

धन्यवाद!